प्रेमदान चौक, सावेडी रोड,
अहमदनगर – 414003, महाराष्ट्र. 

(+९१) ९९२२०९९९९५
(०२४१) २४२६०९२ / २४२६०६०

आमच्या विषयी

ANBHULE MULTISPECIALITY HOSPITAL & STAR ICU

नेत्रचिकित्सक आणि गायनॅक लॅप्रोस्कोपिक सर्जन

DR. BHUSHAN ANBHULE :: Eye Specialist in Ahmednagar | Eye Doctor in Ahmednagar

डॉ. भूषण अनभुले

एम.बी.बी.एस., डी.ओ.एम.एस., एफ.आय.एम.एस.

नेत्रतज्ज्ञ


अरविंद आय हॉस्पिटल मधून त्यांनी मधुमेह रेटिनोपैथीमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे

मायक्रो सर्जरी मध्ये फेलोशिप के.जी. नेत्र रुग्णालय मधून त्यांनी मायक्रो सर्जरी मध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे

Gynecologist in Ahmednagar | Gynaec Doctor in Ahmednagar

डॉ. दिपाली अनभुले

एम.बी.बी.एस., डी.जी.ओ.
गायनॅक लॅप्रोस्कोपिक सर्जन


मुंबई व पुणे येथुन अ‍ॅडव्हान्स गायनाक लेप्रोस्कोपिक सर्जरी मध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे

पुणे, मुंबई, अकोला येथून डेकेअर गायनाक लेप्रोस्कोपिक सर्जरी मध्ये शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे

डॉ. अनभुले मल्टीस्पेसिलीटी स्टार हॉस्पिटल बद्दल

अनभुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, प्रेमदान चौक सावेडी ,अहमदनगर- विषयी थोडी माहिती- डॉ रावसाहेब अनभुले व डॉ क्रांतिकला अनभुले ह्यांनी दत्त हॉस्पिटल जुना बाजार ह्याव्यतिरिक्त हॉस्पिटलची दुसरी शाखा सावेडी येथे सुरू केली- अनभुले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मा शरद पवार साहेबांच्या हस्ते दत्त हॉस्पिटल प्रमाणे १९८७ मध्ये ह्याही शाखेचे उद्घाटन झाले.
डॉ रावसाहेब अनभुले हे व्यक्तिमत्व सर्वच जाणून आहेत , गरिबांची कणव असणारा , हुशार, धडाडीचा , परफेक्ट निदान करणारा हे डॉक्टरांचे वैशिष्ट्य!! रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे एकमेव ब्रिद त्यांनी सर्वांना दिले.
अनभुले हॉस्पिटल येथे ब्रेन व स्पाईन युनिट त्यांनी सुरू केलं- तब्बल गेल्या 25 वर्षांपासून ह्या युनिट ला अतिशय चांगला प्रतिसाद आहे- डॉ भरत नाईक -न्यूरॉसर्जन हे त्या युनिट चे इनचार्ज आहेत.
डॉ रावसाहेबांचे चिरंजीव – डॉ भूषण अनभुले- नेत्ररोगतज्ञ- नेत्रशल्यविशारद ह्यांनी अद्यावत अशा 2009 साली नेत्र -EYE युनिट -ची भर घातली- फेको द्वारे बिनटाक्याच्या डोळ्याच्या शस्त्रक्रिया सुरू केल्यात. डॉ भूषण ह्यांना शासनाकडून केवळ एक वर्षाच्या काळात सर्वाधिक नेत्र शस्त्रक्रिया करणारा एकमेव सर्जन म्हणून प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.मग डॉ भूषण ह्यांनी हॉस्पिटल च्या विस्ताराच्या दृष्टीने 2015 मध्ये आणखीन एक नवीन युनिट सुरू केलं- अतिदक्षता विभाग ICU – सुरुवातीला डॉ गोपाळ बहुरूपी त्यांच्यासमवेत हे युनिट सुरू करण्यात आले, कालांतराने ह्या युनिट चे – डॉ टोमके हे व सध्या डॉ ईश्वर कणसे MD मेडिसिन हे ह्या ICU युनिट चे इंचार्ज आहेत. अतिजोखमीच्या केसेस व इतर रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करण्यात येत आहेत.
ह्यानंतर 2018 मध्ये डॉ भूषण ह्यांनी अद्यावत असे लेप्रोस्कोपी युनिट सुरू केले, ह्या युनिट च्या इनचार्ज त्यांच्या पत्नी डॉ दिपाली अनभुले – गायनेक लेप्रोस्कोपी सर्जन ह्या आहेत- अतिजोखमीच्या केसेस ह्या युनिट ने यशास्वीरित्या पार पाडल्यात- दिड किलोच्या गर्भाशयाच्या गाठिपासून तर गर्भनलिके मध्ये गर्भधारणा राहिल्याने शॉक मध्ये गेलेल्या रुग्णांचेपण सहजतेने दुर्बिणीद्वारे ऑपरेशन यशस्वी केले आहे.
हे सर्व करताना डॉ भूषण अनभुले , ह्यांना हे नेहमीच मनात असायचे वडिलांनी डॉ रावसाहेबांनी दिलेल्या तत्वांवर कसे आपल्याला लोकांच्या जास्तीतजास्त उपयोगी पडता येईल, PRIVATE सेट अप मध्ये हे थोडं कठीण होतं, म्हणून त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले ही शासनाची योजना 2019 मध्ये सुरू करून घेतली- त्या योजनेअंतर्गत आता डोळ्यांचे व स्त्रियांचे बरेच दुर्बिणीद्वारे बिन टाक्याचे विविध ऑपरेशन्स विनामूल्य होत आहेत. हे करताना कित्येक रुग्णांचे शुभाशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत.
एक नवीन युनिट लवकरच सुरू करण्याचा मानस डॉ भूषण सरांनी केला आहे.
ह्यामुळे लवकरच आपल्या- नगरकरांसाठी – अद्यावत वैद्यकीय सेवा कमी दरात उपलब्ध करून देता येईल.

dr-anbhule-hospital-ahmednagar-urologist-doctors-b8s1chkuyo

आमचे विभाग

सामान्य औषधे आणि आयसीयू डिपार्टमेन्ट
सामान्य औषधे आणि आयसीयू डिपार्टमेन्ट

श्री दत्त नेत्रालय लेझर
श्री दत्त नेत्रालय लेझर

मेंदू आणि मणक्याचे काळजी केंद्र
मेंदू आणि मणक्याचे काळजी केंद्र

गायनेक लॅप्रोस्कॉपीक आणि मॅटर्निटी युनिट
गायनेक लॅप्रोस्कॉपीक आणि मॅटर्निटी युनिट